
अकोला : अहमदाबाद येथे बुधवारी घडलेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी ऐश्वर्या, अपघातावेळी हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती.