
अकोला : ना अत्याधुनिक सुविधा, ना राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राऊंड...तरीही अकोल्यातील पोरं थेट देशपातळीवर गाजतायेत. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) या स्पर्धे दर्शन नळकांडे सहभागी झाला आहे.
त्याच्या पाठोपाठ एक पाऊल पुढे टाकत डावखुरा फलंदाज अथर्व तायडेने थेट इंग्लिंश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा मान पटकाविला आहे. बलाढ्य लांकेशायर कौंटी क्लबने त्याला यंदाच्या मौसमासाठी करारबद्ध केले.
अकोला क्रिकेट क्लबच्या अनेक खेळाडूंनी गत दोन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यात विदर्भ क्रिकेट संघाकडून सलामीला खेळणारा डावखुरा आक्रमक शैलीदार फलंदाज अथर्व तायडे याचाही समावेश आहे. त्याला इंग्लंड मधील नॉर्दन क्रिकेट लीग स्पर्धेकरिता लांकेशायर क्रिकेट क्लबने करारबद्ध केले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२१ पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेकरिता अथर्व ता. १५ एप्रिल रोजी सकाळी इंग्लंडकरिता रवाना झाला आहे.
अथर्व इंग्लंड मधील लांकेशायर क्रिकेट क्लब कडून करारबद्ध झाल्याबद्दल त्याचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माझी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी अभिनंदन केले.
रणजी, इराणी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व
वयाच्या आठव्या वर्षापासून अकोला क्रिकेट क्लबवर खेळणाऱ्या अथर्वने यापूर्वी १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाकडूनही खेळला आहे. विदर्भ रणजी विजेत्या संघाकडून इराणी टॉफीतही सहभागी झाला होता.
यंदाच्या मौसमात तो विदर्भाच्या रणजी ट्रॉफी संघातही आहे. अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघाने १९ वर्षीय बी.सी.सी.आय. स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. याच स्पर्धेत अथर्वने त्रिशतकी खेळी करून देशपातळीवरील क्रिकेट तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते. सन २०१८ मधील एसीसी इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतही भारताकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली होती, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.
संपादन - विवेक मेतकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.