esakal | maharashtra budget 2021 : अर्थसंकल्पात अकोलेकरांची निराशाच ! विमानतळाकडे पाठ; चार प्रमुख सिंचन प्रकल्पासाठीही ठोस निधी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Akolekar is disappointed that there is no concrete mention of funds in the budget.jpg

विमानतळासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची अपेक्षा होती. मात्र अद्यापही या विमातनळाच्या उपयोगितेबाबत केंद्राचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने अर्थसंकल्पात ठोस निधीची घोषणा करण्यात आली नसावी, असा अंदाज आहे. 

maharashtra budget 2021 : अर्थसंकल्पात अकोलेकरांची निराशाच ! विमानतळाकडे पाठ; चार प्रमुख सिंचन प्रकल्पासाठीही ठोस निधी नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पातून अकोलेकरांना सिंचन प्रकल्पासह विमानतळाच्या धावपट्टी विस्तारिकरणासाठी ठोस निधीची तरतूद करण्याची अपेक्षा होती. मात्र अजितदादांची पोतडी अकोल्यासाठी रिकामाची राहली असल्याचे दिसून येते. 

अर्थसंकल्पात परिवहन विभागासाठी निधीची तरतूद करताना वित्तमंत्री पवार यांनी अकोला येथील विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी भूसंपादनाचे काम सुरू असल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत त्यात कोणताही ठोस उल्लेख नसल्याने अकोलेकरांची निराशा झाली. अनेक जिल्ह्यांसाठी नवीन प्रकल्पांची घोषणा करताना अकोल्यात जे प्रकल्प सध्या सुरू आहेत, त्यासाठीही ठोस निधी नसल्याने हा अर्थसंकल्प अकोलेकरांसाठी निराशाजनक ठरणारा आहे. विमानतळासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची अपेक्षा होती. मात्र अद्यापही या विमातनळाच्या उपयोगितेबाबत केंद्राचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने अर्थसंकल्पात ठोस निधीची घोषणा करण्यात आली नसावी, असा अंदाज आहे. 

विमानतळ धावपट्टी विस्तारिकरणासोबतच अकोला जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी निधीची तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र गोसेखुर्दसाठी निधी देताना अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येणाऱ्या चारही प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले. जीगाव प्रकल्पासाठीही निधीची तरतुद नाही. त्यामुळे सिंचनाच्या बाबतही अकोला अर्थसंकल्पात ‘कोरडा’च राहल्याचे दिसून येते. अर्थात राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी निधीची तरतुद करण्यात आल्याने अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या वाट्याला त्यातील किधी निधी येतो हे बघणे उत्सुकापूर्ण असेल. 

भाजपकडून टीका तर महाविकास आघाडीकडून स्वागत 

राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्यासाठी कोणताही नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आला नाही. शिवाय जे प्रकल्प आहेत त्यासाठीही निधी नाही. अकोल्यातील पशुधन विकास मंडळाचे कार्यालय हलविण्यात आले. त्याबाबत अर्थसंकल्पातून काही ठोस घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यातही निराशाच झाल्याने राज्यातील विरोध पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांनी या अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्यातील आकडे देवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे सांगून त्याचे स्वागत केले आहे.

loading image