AIMIM Exits Vikas Manch at Akot
sakal
अकोट : नुकत्याच झालेल्या अकोट नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांना सोबत घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘अकोट विकास मंचा’मध्ये ‘एआयएमआयएम’चा समावेश करण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी उसळली आहे. विद्यमान आमदारांनी पक्षाच्या मूलभूत ध्येय–धोरणांना विरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्याकडून खुलासा मागितला आहे.