Akshaya Tritiya 2024 : यंदा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार जास्त पाऊस ; अवकाळीचाही जोर

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर केली जाणारी भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी झाली असून यावर्षी ऑगस्ट , सप्टेंबर या दोन महिन्यात जास्त पाऊस दाखवण्यात आला आहे.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024sakal

भेंडवळ, जि. बुलडाणा : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर केली जाणारी भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी झाली असून यावर्षी ऑगस्ट , सप्टेंबर या दोन महिन्यात जास्त पाऊस दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे पानविडा कायम असल्याने हा संकेत देशाचा राजा कायम राहील याकडे जात आहे. आचारसंहितेमुळे यावर्षी राजकीय भाकीत करण्याचे टाळण्यात आले.

अक्षय तृतियेच्या सायंकाळी भेंडवळ गावालगतच्या शिवारात गेल्या साडेतिनशे वर्षांपासून घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी या मांडणीची सुरवात केली होती. आता त्यांचे वंशज हा वारसा पुढे नेत आहेत. अक्षय तृतियेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयी या मांडणीची पाहणी करून अंदाज वर्तवले जातात. यंदा जून महिन्यात कमी पाऊस, जुलैत साधारण, आॅगस्टमध्ये पहिल्या दोन महिन्यांच्या तुलनेत अधिक आणि सप्टेंबरमहिन्यात भरपूर पाऊस येण्याचा अंदाज आहे. यावर्षात अवकाळी पावसाचाही जोर कायम दाखवण्यात आला. पाणी समस्या कमी राहील.

पिकांविषयीचे अंदाज

खरीपात कपाशीचे पिक कमीअधिक प्रमाणात येईल. ज्वारी, तूर, मूग ही पिके सामान्य आहेत. उडदाचे साधारण पीक असेल. तिळाचे पीक चांगले आहे. यंदा पिकावर किडरोगांचा प्रादूर्भाव राहू शकतो. गव्हाचे पीक भरपूर येऊ शकेल. करडई भरपूर येईल. घटात मांडणी केलेली करडई हे संरक्षणाचेही प्रतीक असते. त्यामुळे देशाचे संरक्षण मजबूत असेल.

पिकांविषयीचे अंदाज

  • कापूस- सर्व साधारण

  • ज्वारी पिक : साधारण पीक, भाव चांगला

  • तूर - साधारण

  • मूग- चांगले

  • उडीद - सर्वसाधारण

  • तीळ- चांगले

  • भादली- रोगराई जास्त

  • बाजरी -साधारण

  • तांदूळ - चांगले/ भावात तेजी

  • मठ- साधारण

  • गहू- चांगले / भावात तेजी

  • हरभरा - साधारण, भाव कमी

इतर अंदाज

  • देशाचा राजा कायम राहील.

  • संरक्षण मजबूत

  • परकीय देशांचा त्रास कायम

  • आर्थिक परिस्थिती चांगली असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com