पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरें यांचे कोरोनामुळे निधन

पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरें यांचे कोरोनामुळे निधन
पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरें यांचे कोरोनामुळे निधन

अकोला : समाज क्रांती आघाडीचे प्रमुख प्रा. मुकुंद खैरे यांचे बुधवारी सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले ते ६३ वर्षाचे होते. खैरेंच्या निधनामुळे आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे. दुर्दैव म्हणजे कोरोनाचा संपूर्ण खैरे कुटुंबावरच घाला घातला. त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे (Adv Shatabdi Khaire) आणि पत्नीचेही नुकतेच निधन झाले. Akola Ambedkari Leader Prof Mukund Khaire dies of COVID after wife daughter Adv Shatabdi Khaire breathes last

अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रा. मुकुंद खैरे यांची प्राणज्योत मालवली. आंबेडकरी समुदायासाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. तीन दिवसांपूर्वी अकोल्यात उपचार सुरु असताना त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे यांचेही कोरोनाने निधन झाले होते. तर गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला.

मुकुंद खैरे - ज्येष्ठ आंबेडकरी नेते

मुकुंद खैरे हे आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते. खैरेंनी 2009 मध्ये अकोल्यातील मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

शताब्दी खैरे कोण होत्या ?

मुकुंद खैरे यांच्या कन्या ॲड. शताब्दी खैरे यांचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. त्या एलएलएम गोल्ड मेडलिस्ट होत्या. तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे तरुण आंबेडकरी समाजाचे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात होती.

शताब्दी खैरे नागपूर उच्च न्यायालयात चार वर्षांपासून कार्यरत होत्या. सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. शताब्दी खैरेंनी बुद्धिस्ट लॉ हे कायदेविषयक पुस्तकही लिहिले होते. आदिवासींच्या शेत जमिनी त्यांच्या नावावर करुन देण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवून सर्वसामान्यांचे अधिकार आणि हक्क कायम ठेवले होते.

आंबेडकरी चळवळीत बाबासोबत मुलीचाही सहभाग

वयाच्या बाराव्या वर्षांपासून शताब्दी खैरे यांनी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला होता.
दिल्ली, नागपूर, मुंबई, अकोला, गाझियाबाद, हैदराबादमध्ये कार्यक्रम केले होते. दुर्दैवाने विदर्भात आंबेडकरी चळवळीचा आधार मानल्या जाणाऱ्या खैरे बापलेकीचा कोरोनाने अंत झाला.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com