Ambulance : ‘डायल १०८’ रुग्णवाहिका सेवेची अविरत दहा वर्षे; दशकभरात पावणेदोन लाख रुग्णांना लाभ

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०८ रूग्णवाहिका सेवेचा राज्यात १ कोटीहून अधिक व्यक्तींना लाभ झाला असून, गत दशकात अकोला जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार व्यक्तींना लाभ मिळाला.
Ambulance
Ambulancesakal
Updated on

अकोला - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०८ रूग्णवाहिका सेवेचा राज्यात १ कोटीहून अधिक व्यक्तींना लाभ झाला असून, गत दशकात अकोला जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार व्यक्तींना लाभ मिळाला आहे. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सेवेची सुरूवात जानेवारी २०१४ मध्ये झाली. राज्यात ९३७ रूग्णवाहिका असून, त्यातील २३३ रूग्णवाहिकांत ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ सुविधा उपलब्ध आहे.

बीव्हीजीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. शरद भटकर म्हणाले की, जिल्ह्यात १६ ठिकाणी १०८ रूग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यात जिल्हा रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, मूर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालय, बाळापूर, अकोट, बार्शिटाकळी व तेल्हारा ग्रामीण रूग्णालय, वाडेगाव, आलेगाव, पातूर, पिंजर, माना, उरळ, पोपटखेड व हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गांधीग्राम उपकेंद्राचा समावेश आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालय, तसेच अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर येथील रूग्णवाहिकेत ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ सुविधा उपलब्ध आहे.

हजारो रुग्णांना जीवनदान

जिल्ह्यात रूग्णवाहिकेद्वारे अपघात, घातक हल्ल्यात जखमी, जळित, हृदयविकाराचा झटका, विषबाधा, इतर अनेक आजारांच्या रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. याद्वारे हजारो रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहोचविल्याने जीवनदान मिळाले. या रूग्णवाहिकांनी कोरोना काळातही महत्वपूर्ण सेवा बजावली आहे. तातडीच्या प्रसंगी गरजूंना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी ही माहिती सर्वदूर पोहोचविण्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com