
अकोला : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आगामी आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचं साकडं घालताना, ‘मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्निक महापूजा करण्याचा मान मिळावा,’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अधिकृत चर्चा नसताना मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना चालना मिळाली आहे.