अन् तुम्ही तर सर्रास विना मास्कचे फिरताय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

कोरोनाचं संकट गडद होताना नागरिक झाले बेफिकीर ः धोक्याची घंटा

अकोलाः अकोल्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत आहेत. असे जरी असले तरी याची चिंता न करता शहरातील नागरिक सर्रास विना मास्कचे फिरत आहेत. यामुळे समुह संक्रमणाचा धोका नाकारत येत नसतानाही लोक ऐवढे बेफिकीर का झाले आहेत याचाही या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे. तर जे नागरिक मास्क घालत नाहीत अशांवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराकडे आगेकूच करीत आहे. यातील साडेपाचशेहून अधिक नागरिक बरे होऊन घरी जरी परतले असले तरी येणाऱ्या काळात हा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिकाना त्रास होऊ नये म्हणून अनलॉक सुरू करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये नागरिकांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे बाहेर फिरताना तोंडाला मास्क बांधणे, वारंवार हात धुणे, जिथे पाणी नसेल अशावेळी सॅनिटायझरचा वापर करणे आदी निर्बंध घालून देण्यात आले आहेत. असे जरी असले तरी मात्र, अकोल्यात काही नागरिक बेफिकीर होऊन वागत आहेत. रस्त्यावर खरेदीसाठी आलेले नागरिक विना मास्कचे फिरून स्वतःला धोक्यात टाकत असल्याचे दिसून येत आहे.

खरेदीसाठी येताय तर तोंडाला बांधा
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती. मात्र यामध्ये अत्यावश्यक सेवा या वगळण्यात आल्या होत्या. मात्र अनेक कारणे सांगत शुल्लक कारणावरून घराबाहेर निघणाऱ्यांची संख्या वाढली होती. दररोज मार्केटला जावून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा जीवावर बेतू शकते त्यामुळे विनाकारण घराबाहेर निघणे म्हणजे समुह संसर्गाचा धोका वाढविण्याचे लक्षण आहे.

डिस्चार्ज जरी मिळत असला तरी मृत्यूचे प्रमाण बघा
दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी, पूर्णपणे उपचार घेवून सुखरूप घरी परतणाऱ्याची संख्याही समाधानकारक आहे. अकोल्यात आतापर्यंतची बाधितांची संख्या एकूण 963 झाली असून, त्यापैकी 586 रुग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 333 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एका आत्महत्येस 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And you walk around without a mask ... 

Tags
टॉपिकस
Topic Tags: