काँग्रेसचे अनिल पाटील काळाच्या पडद्याआड

कोरोनामुळे निधन, मनमिळावू लोकनेता हरपला
काँग्रेसचे अनिल पाटील काळाच्या पडद्याआड

मोताळा (जि.बुलडाणा) : मोताळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्यपती अनिल प्रकाश खाकरे-पाटील (३९) यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलडाणा येथील रुग्णालयात मंगळवारी (ता.१८) सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. Anil Patil of Buldana Congress dies due to corona

तालुक्यातील मूर्ती येथील मूळ निवासी व सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेले अनिल खाकरे-पाटील हे अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्वाचे धनी होते. ते कोथळी बोराखेडी जि.प. सर्कलचे माजी सदस्य होते. त्यांच्या अर्धांगिनी जयश्री खाकरे-पाटील या सर्कलच्या विद्यमान जि.प. सदस्या आहेत.

अनिल खाकरे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाने गाठले. त्यामुळे चार ते पाच दिवसांपासून त्यांच्यावर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. अखेर मंगळवारी सकाळी सात वाजता उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेसचे अनिल पाटील काळाच्या पडद्याआड
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

अनिल खाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला असल्याचे समजते. त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच पंचक्रोशीतील नागरिक सुन्न झाले. अनिल खाकरे-पाटील यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मनमिळावू व्यक्तिमत्वाच्या बळावर त्यांनी चाहत्यांचा भलामोठा गोतावळा निर्माण केला होता. या उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त होणे अनेकांच्या काळजाला चटका लावणारा आहे. त्यांच्या निधनाने राजकारण व समाजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

बातमीदार - शाहीद कुरेशी

संपादन - विवेक मेतकर

Anil Patil of Buldana Congress dies due to corona

काँग्रेसचे अनिल पाटील काळाच्या पडद्याआड
खळबळजनक; तब्बल दहा खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com