अक्षयतृतीयेच्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीयाच्या मांडणीचे भाकीत जाहीर करताना चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज

अक्षयतृतीयेच्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर

जळगाव (जामोद) - सुमारे तीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ घटमांडणी व पीक पाणी व पाऊस अंदाज वर्तविण्याची प्रथा आजही त्यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवली असून अक्षय तृतीयेला गावाबाहेरील शेतामधील घटांमध्ये सायंकाळी मांडलेल्या ह्या मांडणाचे भाकीत दिनांक४मे रोजी सकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आले. ह्या वर्षी पावसाळा सर्वसाधारण स्वरूपाचा असून खरिपातील तूर,कपाशी व रब्बीतील गहू, हरभरा ही पिके सर्वोत्तम राहतील, पशुपालकांना चारा टंचाईचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. देशाचा राजा हा कायम असला तरी परकीय संकटाची भीती मात्र राहणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत असल्याचे भाकित ह्या मांडणीतूनजाहीर करण्यातआले.बुलढाणा,अकोला,वाशिम जिल्हासह खानदेशातील हजारो शेतकऱ्यांसमक्ष चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी चंद्रभान महाराजांच्या जयघोषात हे भाकीत जाहीर केले.

अक्षय तृतीयेची घटमांडणी गावाच्या जवळच असलेल्या शेतामध्ये दि. ३मे रोजी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी घट मांडणी करण्यात आली. ह्या घटाच्या मध्यभागी एक खड्डा करून मातीच्या ढेकळांवर पाण्याची घागर ठेवण्यात आली. आणि त्या घागरीवर कुरडई चा नैवेद्य ठेवण्यात आला. खड्ड्याभोवती गोलाकार घटामध्ये १८ प्रकारची धान्य ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मे रोजी सकाळी ५ वाजता पुंजाजी महाराज त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी घटाचे अवलोकन केले.घटातील मातीच्या ढेकळाची घागर,कुरडई, नैवेद्य व त्याचे निरीक्षण करून देशभरातील पीक पाण्याचा अंदाज, देशाची संरक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडी, भाकित वर्तवण्यात आले. गुढीपाडव्याला गावातील पारावर मांडलेल्या पूर्व मांडणीच्या निष्कर्षाशी ह्या अक्षयतृतीयेच्या मांडणीचे निकस जोडण्यात आल्यानंतर पाऊस पीक पाण्याची भविष्यवाणी वर्तवण्यात आली.

पावसाचा अंदाज:

घटामध्ये घागर खाली असलेल्या मातीची ढेकळे पूर्णपणे ओली झाली होती. त्यावरून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. पहिल्या जून महिन्यामध्ये पाऊस हा सर्वसाधारण स्वरूपाचा असून दुसऱ्या महिन्यात जुलैमध्ये त्यापेक्षा कमी राहील. तिसऱ्या आगस्ट महिन्यांमध्ये पाऊस हा एकदम चांगला असेल, तर चौथ्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा तिसऱ्या महिन्याहोऊन अधिक असेल. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पावसामुळे कुठे कुठे पूर परिस्थिती सुद्धा संभवते. यावर्षी जास्त प्रमाण असा अवकाळी पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.घटामध्ये पूरी गायब असल्यामुळे पुराचे संकट सुद्धा बऱ्याच ठिकाणी उदभवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तिसर्‍या आणि चौथ्या महिन्यामध्ये कुठे अधिक तर कुठे भरपूर स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे जिथे जास्त स्वरूपाचा पाऊस पडेल तिथे पिकांची नासाडी सुद्धा होऊ शकते आणि जिथे कमी स्वरूपाचा पाऊस पडेल तिथे दुष्काळी परिस्थिती सुद्धा उद्भवू शकते असेही या वेळी सारंगधर महाराजांनी कथित केले. पशुपालकांना चाराटंचाई तर सुद्धा बर्‍याच भागात सामना करावा लागणार आहे.

राजकीय भाकित

राजा हा कायम असणार म्हणजे देशात सत्तांतर होणार नाही. परकीय संकट येईल व राज्याची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची राहणार आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही कमकुवत होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटामध्ये विड्याच्या पानावर पैशावर सुपारी ठेवली होती. ती थोडी सरकली आहे.राजा कायम असला तरी आर्थिक टंचाई भासणार आहे असा याचा निकष आहे.

आरोग्यविषयक भाकीत

भादली हे पीक रोगराईचे प्रतीक आहे. भादली है घटाच्या आत-बाहेर फेकले गेले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात रोगराई येणार आहे, पण मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी राहणार आहे.

१८ प्रकारची धान्य

अक्षय तृतीयेच्या दिवशी घटांमध्ये अंबाडी, सरकी (कपाशी), ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, हिवाळी मुग, साळी(भात), जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी, मसूर ही धान्य मांडण्यात आली होती.

Web Title: Announcement Of Akshay Tritiyas Ghatmandni At Bhendval

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akshaya Tritiya
go to top