
अकोला : अकोला जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावर महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे आयपीएस अधिकारी बच्चन सिंह यांची नागपूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ग्रुप क्रमांक ४ च्या कमांडर पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.