अकोल्यात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

जिल्ह्यात बारावीचे ६७२ तर इयत्ता दहावीचे ५१८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. या संदर्भात परीक्षांच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 

अकोला : इयत्ता दहावी व बारावीच्या शुक्रवार ( दि.२० नोव्हेंबर) पासून सुरु होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बारावीचे ६७२ तर इयत्ता दहावीचे ५१८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. या संदर्भात परीक्षांच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 

इयत्ता १२ वी ची परीक्षा केंद्र

१) शहाबाबू उर्दू कॉलेज, अकोला
२) सिताबाई ज्युनिअर कॉलेज, 
३) श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट
४) एस.बी. कॉलेज, तेल्हारा
५) श्रीमती धनाबाई कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर

इयत्ता १०वी ची परीक्षा केंद्र

१) मुंगिलाल बाजोरिया कॉन्व्हेंट स्कूल, अकोला
२) नरसिंग विद्यालय, अकोट, 
३) अंजुमन उर्दू हायस्कूल, बाळापूर

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. तेथे त्यांची थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरच्या सहाय्याने चाचणी करावी असे निर्देशही देण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangements have been made at eight examination centers in Akola for the supplementary examination of SSC and HSC