esakal | जिल्हा उपनिबंधकासह सहाय्यक कर आयुक्त एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

bribe1.jpg

सातवा वेतन आयोगाचे वेतन निश्चिती आणि एरीअससाठी मागितली होती लाच

जिल्हा उपनिबंधकासह सहाय्यक कर आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः  तक्रारदाराचे व त्यांच्या अधिननस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व एरीअसच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी  जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण लोखंडे आणि सहाय्यक कर आयुक्त (विक्री कर विभाग) अमर शेठ्ठी या दोघाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.9) दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.  या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 
   तक्रारदाराने  10 जून रोजी एसीबीच्या कार्यालयात येऊन त्यांचे आणि त्यांच्या अधिनिस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व एरीअसच्या प्रस्तावास मान्यता देण्याकरीता जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे आणि सहाय्यक कर आयुक्त अमर शेठ्ठी या दोघांनी पाच एरीअसचे निघणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कमेची प्रथम मागणी केली व नंतर पाच लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.  अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर 10 जून ते 4 जुलैपर्यंत एसीबीचे उपअधीक्षकम एस.एस.मेमाणे यांनी तक्रारदार यांना आरोपीची लाचेची मागणी आहे किंवा कसे याबाबत पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान दोन्ही आरोपींनी तक्रारदारास लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.