लसीकरण केंद्रावर; कुणी टोकन देता का टोकन?

लसीकरण मोहीम मधील टोकन पध्दत बंद करा; नागरिकांची हेळसांड थांबववा; आरोग्य सांभाळा
लसीकरण केंद्रावर; टोकन देता का टोकन!
लसीकरण केंद्रावर; टोकन देता का टोकन!File Photo

अकोला ः दोन महिन्यांपूर्वी कुणाला लसीकरणाच्या सल्ला दिला तर खरच आवश्यक आहे का? त्याने दुष्परिणाम होतात का? नाही घेतली तर काय होईल? असे प्रश्न विचारले जायचे; पंरतू कोविड-१९ (Covid-19) संसर्ग पाहता ‘भागो कोरोना आया’ असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे सर्व सेंटरवर कोणी ‘लस देता का लस’ अशी ओरड सुरू आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण (Vaccination) सुरू झाल्यामुळे वय ४५ वरील दुसऱ्या डोजवाल्यांना लस मिळेनाशी झाली. त्यामुळे टोकण पद्धत थांबवून नागरिकांची हेळसांड थांबवण्यात यावी व नागरिकांचे आरोग्य सांभाळावे, असे मागणी भाजपचे (Bjp) प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी केली आहे. Turn off the token system in the vaccination campaign

नुकताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वय १८ ते ४४ गटातील नागरिकांचे लसीकरण थांबवून ४५ वरील गटातील दुसरा डोज बाकी असणाऱ्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मुळातच पूर्वी सुरू असलेले ६० वर्षावरील लोकांचे लसीकरण पूर्ण व्हायचे असताना वय ४५ वरील लसीकरण सुरू करण्यात आले.

त्यामधील काही लोकांनी पहिला डोज घेतला तर काहींच्या अजून पहिलाच बाकी आहे. ज्यांचा पहिला डोज झाला त्यांना दोन ते अडीच महिने होऊन सुध्धा दुसऱ्या डोजची प्रतीक्षा आहे. काही लसीची कार्यकाळ कमी असल्यामुळे उशिरा घेतल्यास प्रभाव कमी होऊ शकतो हे सत्य नाकारता येणार नाही. शासनाच्या उशिरा लक्षात आल्यामुळे दुसऱ्या डोजवाल्यांचे लसीकरण सुरू झाले आहे, ही आनंदाची बातमी आहे. परंतु, अकोला मनपा क्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे, अस्तित्वात असलेले सेंटर अपुरे पडत आहेत.

त्या सेंटरवर पूर्वी न.प. नळावर पाण्यासाठी लागणाऱ्या रांगा प्रमाणे सकाळी ४ ते ५ वाजेपासून तर काही ठिकाणी रात्री १२ पासून नागरिक लसिकरणासाठी आगाऊ लागणारे टोकन मिळविण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यामध्ये वयोवृद्ध नागरिक सुध्दा आहेत. वास्तविक दुसऱ्या डोजवाल्यांची नोंदणी पूर्वीच झालेली आहे. परंतु लस मिळणार की नाही यासाठी एका एका सेंटरवर हजारो लोक जमा होत आहेत.

त्यापैकी नशीबवान २०० पैकी १६० दुसरा डोज व ४० जण पहिला डोज वाले ठरत आहेत. वास्तविक २०० लसिकरणासाठी एक हजार लोकांची गर्दी करणे योग्य आहे का? यासाठी कोठेतरी प्रशासनाने पुढाकार घेणे क्रममात्र आहे. सुरळीत व निर्विवाद लसिकरणासाठी टोकन पध्दत बंद केली पाहिजे. ज्यांची नोंदणी झाली आहे अशा २०० लोकांना मेसेजद्वारे बोलाविले तर गर्दी टाळता येईल किंवा निवडणुकीत जी बूथ पध्दत अवलंबिले जाते तसे नियोजन केले तर प्रत्येक नागरिकांचे लसीकरण सुरळीत होईल व गर्दी सुध्दा होणार नाही.

प्रभाग निहाय लसीकरण केल्या गेले तर वयोवृद्ध नागरिकांची हेळसांड होणार नाही. उन्हाळ्याची दाहकता पाहता लसीकरण सकाळी लवकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी अकोला व नोडल अधिकारी अकोला यांचे कडे एका निवेदनाद्वारे भाजप नेते डॉ अशोक ओळंबे, यांनी केली आहे.

संपादन : विवेक मेतकर

Turn off the token system in the vaccination campaign

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com