

Akola
esakal
बाळापूर: दारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाडेगाव येथील ग्रामसेवक आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २५) रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल व ग्रामीण विकास वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश तोताराम कापकर (ग्रामसेवक) आणि सुभाष रामकृष्ण सरप (लिपीक, वय ५७ वर्ष) असे लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत.