बाळापूर - संततधार पावसामुळे बाळापूर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही महेश आणि मन नद्यांच्या पुलावरुन चार ते पाच फूटांपर्यत पाणी वाहू लागल्याने बाळापूर शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. तर नदीपात्राचे पाणी शहरातील काही भागात शिरले. नगर परिषदेच्या कार्यालयाच्या तळा पर्यंत पाणी आले आहे.