

Akola Crime News
esakal
बाळापूर: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी, फरार पोलिस शिपाई पवन वडगावे याच्या अखेर अकोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अत्यंत हुशारीने दर दोन-तीन दिवसांनी मोबाईल व सिमकार्ड बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व बाळापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नांदेड जिल्ह्यातील ‘नारसी’ या ग्रामीण भागातून सोमवारी (ता.३) भल्या पहाटे अटक केली.