

Akola News
esakal
बाळापूर: तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत मध्यस्थांकडून सुरू असलेल्या आर्थिक लुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर आता थेट शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या २० सदस्यीय समितीच्या माध्यमातूनच दलालांचे फावत असल्याची जोरदार चर्चा असून, या संपूर्ण समितीचीच सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.