

Balapur Soybean Crop
esakal
बाळापूर: सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर उभे राहिलेले सोयाबीन पीक आता फुलोऱ्यात व शेंगा धरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पावसाने तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ दडी मारली आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, तालुक्यातील सुमारे ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.