Akola News: बाळापूर तालुक्यात सूर्याचा प्रखर तडाखा; शासकीय कार्यालयांत शुकशुकाट; शेतकरी आणि मजूर वर्ग बेजार

Government Offices Witness Minimal Attendance: बाळापूर तालुक्यात उष्णतेची तीव्र लाट पोहोचली असून तापमान ४४–४५ अंशांवर आहे. सूर्यप्रकाशामुळे शासकीय कार्यालयांत शुकशुकाट, शेतकरी व मजूर वर्ग दमछाक आणि बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: विदर्भातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, बाळापूर तालुक्यात तापमानाचा पारा आता ४४ अंशांच्या वर पोहोचला आहे. सूर्याच्या प्रखर झळांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा थेट परिणाम शासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. दुपारी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते ओस पडत असून, वाढत्या उष्णतेमुळे मजूर आणि शेतकरी वर्ग घामाने बेजार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com