साडेतीन एकरातील हरभऱ्याचे पिक जळून खाक ; अज्ञात माथेफिरुने केली शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी

In Balapur, a three and a half acre gram crop has been burnt to ashes.jpg
In Balapur, a three and a half acre gram crop has been burnt to ashes.jpg
Updated on

बाळापूर (अकोला) : मळणीसाठी लावून ठेवलेल्या साडेतीन एकरातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावल्याची घटना शनिवारी सकाळी हातरुण शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेत दोन लाख रुपयांचा शेतीमाल जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकार व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. 

उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हातरुण येथील मोहम्मद हनिफ या शेतकऱ्याची हातरुण गावालगत शेती आहे. साडेतीन एकर शेतात हरभऱ्याचे पिक होते. ओलिताखाली असलेले हरभऱ्याचे पिक डोळ्यात भरल्यासारखे होते. शेतकऱ्याने पिकाची कापणी करून मळणीसाठी शेतातच गंजी घातली होती. पिकाच्या राखणीसाठी गावातीलच एक रखवालदार होता. शुक्रवारी रात्री तो घरी आल्यावर गावातील अज्ञात व्यक्तीने शनिवारी पहाटेच्या सुमारास सदर गंजीला आग लावून दिली.

या आगीत दोन लाख रुपयांच्या हरभऱ्याचे पिक भस्मसात झाले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सदर शेतकऱ्याने टाहो फोडला. अज्ञात माथेफिरुच्या दृष्ट प्रवृत्तीने शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी करून टाकली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत पिक जळून खाक झाले होते. हातरुण येथील पटवारी अजय भटकर यांनी नुकसानीचा अहवाल वरीष्ठांकडे पाठवला आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी अज्ञात माथेफिरु विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com