अकोला - 'गे-डेटिंग’ अॅपच्या माध्यमातून बँक अधिकाऱ्याला जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही टोळी अशा प्रकारे समलैंगिक पुरुषांना लक्ष्य करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.