

Akola News
esakal
बार्शीटाकळी: तालुक्यातील मिर्झापूर शेतशिवारात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली असून, वडिलांनीच त्यांच्या स्वतःच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस ठाणे बार्शीटाकळी अंतर्गत ही घटना घडली असून, आरोपी दिलीप लहानू मोटे (वय ३०, रा. नांद्री काळेगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याने स्वतःच्या मुलगा प्रेम दिलीप मोटे (वय ८) याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याची पत्नी हे मागील दोन दिवसांपासून मिर्झापूर येथे आले होते. शनिवारी (ता.२) संध्याकाळी आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला.