काटेपुर्णा प्रकल्पाच्या पाण्यातून पाणी वापर संस्थेच्या लाभधारक शेतकऱ्यांनी फुलवली गहू हरभरा पिकांची बाग..!

अनुप ताले
Thursday, 19 November 2020

शेतकरी आपली स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळतच नव्हे तर देशाच्याही उत्पन्नात व उत्पादनात ही भर पडावी, या उद्देशाने पाणी वापर संस्थांवरील लाभदायक शेतकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. खरिपातील पिकाची नाराजी झटकून पुन्हा रब्बीच्या पिकाचा डोलारा उभारावा, या उमेदीने शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची बाग फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. 'हम होंगे कामयाब एक दिन' या एका आशेने पुन्हा काटेपुर्णा प्रकल्पावरील लाभधारक शेतकरी कामाला लागला आहे.

अकोला : जिल्ह्यातील महान धरणावर असलेल्या मध्यम स्वरूपाचा प्रकल्प म्हणजे काटेपुर्णा प्रकल्प हा यावर्षी १०० टक्के पाण्याने भरून त्याचे पाणी ओवर फ्लो होऊ नये म्हणून पावसाळ्यात दोन वेळा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले होते. सन २०२० व उडीद २०२१ च्या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर काटेपुर्णा प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेच्या लाभधारक शेतकर्‍यांचा उत्साह व आनंद द्विगुणित झाला. 

त्याचा उत्सव करण्याकरिता प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेनी आ.मिटकरी व शेतकरी जागर मंचाचे संयोजक कृष्णाभाऊ अंधारे तसेच काटेपुर्णा पाणी वापर संस्था प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी महाण धरणाचे पूजन केल्यानंतर लगेच बोरगाव मंजु येथे कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन कालव्यावरील समस्या या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वाकोडे, उपविभागीय अधिकारी श्री.चव्हाण, तसेच अकोला पूर्वचे मा.आ.रणधीर भाऊ सावरकर यांच्या पुढे मांडल्या. त्यावेळी प्रकल्पाचे कार्याध्यक्ष मा. दिंगबर गावंडे व संचालक संजय गावंडे तसेच भुजिंग गावंडे व आदी लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

अकोल्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या बैठकीत प्रकल्पावरील लाभधारक शेतकऱ्यांच्या पाणी मागणीनुसार १५ नोव्हेंबरला २०२० लाच पाणी सोडण्याची मागणी केली व त्यांचे नियोजन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मा. श्री वाकोडे व उपकार्यकारी अधिकारी मा. चव्हाण तसेच शाखा अधिकारी निलेश घारे व दशरथ उगले यांच्या नियोजनातून १५ नोव्हेंबरला २०२० ला खांबोरा किटीवेअर वरून पाणी सोडण्याचा शुभारंभ काटेपुर्णा प्रकल्पस्तरीय अध्यक्ष मा. मनोज तायडे व कार्याध्यक्ष दिंगबर पा. गावंडे व लघु कालव्याचे अध्यक्ष भुजिंगराव गावंडे यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या पर्वावर करण्यात आला. पण सन २०२० मधील खरिपाचा हंगाम वायरस बोंडअळी व परतीच्या पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी पुर्णपणे खचला आणि त्यात सरकारची मदत नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या पुंजीतून व कुवतीनुसार बाजारातून कर्ज घेऊन रब्बी हंगामाचे हरभरा व गहू या पीकांचे कसेबसे नियोजन केले. त्यात बदलत्या वातावरणात कधी थंडी तर कधी ऊन अशा परिस्थितीत पाण्याशिवाय हरभराचे पीक कसे येईल या आशेवर उभा असलेला शेतकरी काटेपुर्णा प्रकल्पाच्या पाण्याने आनंददायी होऊन दिवसरात्र तुषार सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन करून मोठा उच्चांक गाठत आहे. 

शेतकरी आपली स्वतःची कौटुंबिक जबाबदारी सांभाळतच नव्हे तर देशाच्याही उत्पन्नात व उत्पादनात ही भर पडावी, या उद्देशाने पाणी वापर संस्थांवरील लाभदायक शेतकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. खरिपातील पिकाची नाराजी झटकून पुन्हा रब्बीच्या पिकाचा डोलारा उभारावा, या उमेदीने शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची बाग फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. 'हम होंगे कामयाब एक दिन' या एका आशेने पुन्हा काटेपुर्णा प्रकल्पावरील लाभधारक शेतकरी कामाला लागला आहे.

सिंचन कायदा २००५ व नियम २००६ नुसार टेल टू हेड ही पाणी नियोजनाची संकल्पना मनाशी बाळगून सिंचन सुलभ रित्या होण्याकरिता पाणी व्यवस्थापन चालविण्याचा ध्यास काटेपुर्णा प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेने घेतला आहे, अशी जाणीव प्रकल्पावर फिरत असताना प्रकल्प अध्यक्ष मा.मनोज तायडे यांच्याकडे कौलखेड जहांगीर सरपंच प्रदीप तायडे, पोलिस पाटील, भारत तायडे, डॉ रविंद्र चौखंडे, प्रभाकर तायडे, भटोरी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तायडे, दताळा मायनर अध्यक्ष बाबुराव पाटील, प्रदिप झोंबाळे आदी शेतक-यांनी व्यक्त केली. पाण्याचा प्रवाह पिकाचे पाणी होईपर्यंत चालू ठेवावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाचे अधिकारी मा. वाकोडे यांच्याकडे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष मा. मनोज तायडे यांनी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beneficiary farmers of Katepurna project have started planting wheat gram crop