अनाथ बालकांना परस्पर दत्तक घ्याल तर खबरदार!

गैरप्रकारांबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन
अनाथ बालकांना परस्पर दत्तक घ्याल तर खबरदार!

अकोला ः कोविड १९ च्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या दत्तक देवाण घेवाण बाबत विविध समाजमाध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा कोणत्याही समाजमाध्यमांद्वारे बालकांची दत्तक विधान प्रक्रिया होत नाही. अशा प्रकारात समाजकंटकांचा सहभाग असू शकतो व त्यातून बालकांची अवैध विक्री इत्यादी प्रकाराचा धोका असू शकतो. समाजातील जागरुक नागरिकांनी याबाबत तात्काळ महिला व बालविकास अधिकारी तसेच पोलिस विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन Department of Women and Child Welfare महिला व बाल कल्याण विभागाने केले आहे. Beware of orphaned children!

अनाथ झालेल्या बालकांबाबत तसेच अशा बालकांना दत्तक घेऊ इच्छा असणाऱ्या पालकांसाठी ‘सीएआरए.एनआयसी.ईन’ या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

अनाथ बालकांना परस्पर दत्तक घ्याल तर खबरदार!
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

कुठे बेकायदेशिररित्या दत्तक घेण्याचे प्रकार समोर आल्यास महाराष्ट्राच्या सारा संस्थेच्या क्रमांकावर माहिती द्यावी. बालकांना परस्पर दत्तक घेणे वा देणे, बालकांची खरेदी-विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून भारतीय दंड संहिता १८६० बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ तसेच दत्तक नियमावली २०१७ नुसार कठोर कारवाई केली जाते. कायदेशीर दत्तक घेण्यासाठी सारा या संकेतस्थळावर माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com