Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Maharashtra

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल

वाशीम : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा १५ व १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातून प्रवेश करीत असुन पुढे अकोला जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. या पदयात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असून वाहनांची संख्या देखील मोठी राहणार आहे. व्हिआयपी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून यात्रेच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणे गरजेचे आहे.

परंतू नागरिकांची गैरसोय होणार नाही याकरीता पर्यायी वळण रस्ते देण्यात आले आहे. १५ ते १६ नोव्हेंबर पर्यंत पदयात्रा वाशीम जिल्ह्यात कन्हेरगांव नाका ते मेडशीपर्यंत एकूण ५५ किमी प्रवास करणार आहे. त्यादरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद करुन त्यांना पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे निर्देश दिले आहे.

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ख) नूसार जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी १५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मूळ मार्गावरील वाहतूक प्रस्तावित मार्गावर वाहतूक वळविणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. वाहतुकीकरीता बंद करणे आवश्यक असलेले मार्ग वाशीमकडून हिंगोलीकडे जाणारी सर्व वाहतूक १४ नोव्हेंबर रोजीचे रात्री वाजतापासून बंद राहील.

पर्यायी मार्ग वाशीमवरून हिंगोलीकडे जाण्याकरीता रिसोड, सेनगाव, नर्सरी टी पॉइंट मार्ग हिंगोली १५ नोव्हेंबर रोजी वाशीमकडून हिंगोलीकडे जाणारी सर्व वाहतुक बंद. पर्यायी मार्ग वाशिमवरून हिंगोलीकडे जाण्याकरीता रिसोड, सेनगाव, नर्सरी टी पॉइंट मार्ग हिंगोली. हिंगोलीकडून वाशीमकडे येणारी सर्व वाहतूक बंद, पर्यायी मार्ग अकोला, बाळापूर व पातूरकडून हिंगोलीकडे जाणारी वाहतुक मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव नर्सी टी पॉइंट मार्ग हिंगोली. मालेगांवकडून वाशीमकडे येणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग मालेगाववरुन वाशीम जाण्याकरीता शेलूबाजार, मंगरूळपीरमार्ग वाशीम. मेहकरकडुन मालेगांवमार्ग वाशीमकडे येणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग मेहकरकडुन वाशीम जाणेकरीता मालेगांव,शिरपुर, रिसोड मार्ग वाशीम. मालेगांववरुन पुसद जाणेकरीता शेलुबाजार,मंगरुळपीर, मानोरा, दिग्रसमार्गे पुसद. अमरावतीकडुन हिंगोली जाणेकरीता कारंजा, मालेगांव, शिरपुर, रिसोड, सेनगांव, नर्सी टी पॉईंट मार्ग हिंगोली.

१५ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरांतर्गत मुख्य रस्ता हिंगोली नाका,पुसद नाका,पोस्ट ऑफीस चौक, पोलीस स्टेशन वाशिम शहर चौक, अकोला नाका, मालेगाव रोडवरील पाटील ढाबा पर्यंत येणारी व जाणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग मुख्य मार्ग बंद राहिल्याने वाशिम शहरांतर्गत पूर्व वाशीम भाग व पश्चिम वाशीम भाग यांना जोडण्याकरीता सिव्हिल लाइन्स, काटारोड मार्गे पाटील धाबा, मथुरा हॉटेल, झाकलवाडी, रिसोड रोड असा पर्यायी मार्ग (हलक्या वाहनांकरीता) दोन्ही बाजुने ये-जा करण्याकरीता वापरण्यात यावा.

१६ नोव्हेंबर रोजी वाशिमकडुन मालेगांव व पातुरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद, पर्यायी मार्ग वाशिम कडुन मालेगाव जाण्याकरीता मंगरूळपीर, शेलूबाजार मार्गे मालेगांव. मालेगाव कडून वाशिमकडे येणारी सर्व वाहतूक बंद पर्यायी मार्ग वाशिमकडुन पातुर जाणेकरीता मंगरुळपीर, शेलुबाजार बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. मालेगाव कडून पातुरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद पर्यायी मार्ग मेहकरकडुन वाशिम जाणेकरीता मालेगांव,

शिरपुर, रिसोड मार्गे वाशिम. पातुर कडून मालेगाव व वाशिमकडे येणारी सर्व वाहतुक बंद, पर्यायी मार्ग अमरावती, यवतमाळ, कारंजाकडुन पातुर जाणेकरीता कारंजा, शेलुबाजार, बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. मेहकरकडुन पातुर जाणेकरीता मालेगांव, शेलुबाजार, बार्शीटाकळी, अकोला मार्गे पातुर. पदयात्रा मालेगांव येथुन मेडशीकडे निघाल्यानंतर मालेगांव बायपास अकोला नाका वरुन कारंजा ते मेहकर (नागपुर ते औरंगाबाद महामार्ग) चालणारी वाहतुक ही किमान २ तास थांबविणे.

१७ नोव्हेंबर रोजी मालेगांवकडुन पातुरकडे जाणारी सर्व वाहतुक १० वाजता पर्यंत बंद, पर्यायी मार्ग मालेगावरुन पातुरकडे जाण्याकरीता शेलुबाजार, बार्शीटाकळी, अकोलामार्गे पातुर पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

कनेरगाव नाका पुलावर स्वागत

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा कनेरगाव पुलावर मराठवाड्यातून वाशीम जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे. पैनगंगा नदीवरील पुल अर्धा मराठवाड्यात तर अर्धा विदर्भात येतो. पैनगंगा नदी विदर्भ मराठवाड्याची सिमारेषा आहे याच सिमारेषेवर जिल्हा कॉंग्रेस कमेटीकडून राहूल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.