अकोला : भुसावळ-नारखेड, भुसावळ-नागपूर पॅसेंजरची प्रतीक्षा!

एसटी संपाने प्रवाशांची गैरसोय; खासगी वाहतूकही अडचणीची
Railway Passenger
Railway PassengerSakal

अकोला : रेल्वे विभागाने आता रेल्वेगाड्यांचा स्पेशल दर्जाकाढून सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, केवळ एकच मेमू सुरू केल्याने पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार, असा प्रश्न आता प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. अकोला मार्गे धावणाऱ्या भुसावळ -नारखडे, भुसावळ-नागपूर, भुसावळ वर्धा या पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यास एसटी संपामुळे होत असलेली प्रवाशांची गैरसोय बऱ्याच प्रमाणात टाळता येण्यासारखी आहे.

अकोला रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली बडनेरा ते भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही भुसावळ ते नागपूर, भुसावळ ते नारखेड पॅसेंजर सुरू झालेली नाही. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याकडे लक्ष देत भुसावळ मध्य रेल्वे विभागाने तत्काळ पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यां ची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने याचा विचार होणे गरजेचे आहे.

Railway Passenger
नाशिक : हुडहुडी भरली; तापमान १२ अंशांवर

जादा दर देवूनही गैरसोय

एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहे. प्रवाशांना खासगी वाहतुकीशिवाय पर्याय नाही. रेल्वेत आरक्षित तिकिट असलेल्यांनाच प्रवाश करता येतो. दुसरीकडे खासगीमध्ये जादा दर देवूनही गैरसोयीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. सध्या शाळा-महाविद्यालये सुरू आहेत. लग्न समारंभाचे दिवसही आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. ते बघता खासगी वाहनांमध्ये सक्षतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात आहे. त्यातून नियमित प्रवाशांची होणारी गैरसोय बघता रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू केल्यास प्रवाशांसाठी सोयीचे प्रवाशी साधन उपलब्ध होईल.

भुसावळ - नागपूर मार्ग

  • भुसावळ - बडनेरा मेमू (सुरू आहे)

  • भुसावळ - वर्धा पॅसेंजर (बंद आहे)

  • भुसावळ - नागपूर पॅसेंजर (बंद आहे)

  • दक्षिण-मध्य रेल्वेकडून पॅसेंजरचे दर

Railway Passenger
औरंगाबाद : वाहतूक नियम पाळा, नसता गुपचूप दंड भरा

अकोला-पूर्णा या मार्गावर दक्षिण-मध्य रेल्वे तीन गाड्या सुरू केल्यात. त्यागाड्या पूर्वी पॅसेंजर म्हणून धावत होत्यात. मात्र, आता त्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देवून त्या प्रमाणे तिकिट आकारले जात आहे. यातील दिवस धावणाऱ्या दोन गाड्यांना थांबा नसतानाही अनधिकृतपणे सर्व स्टेशनवर थाबंविली जात आहे. मात्र, तिकिट मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. रात्री धावणारी गाडी मात्र, कुठेही थांबत नसल्याने प्रवाशांची गैर सोय होत आहे.

२५ मार्च २०२० पासून बंद आहेत गाड्या

देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यात कधीही न थांबणारी देशातील लोकवाहिनी सुद्धा थांबली. ता. २५ मार्च २०२० पासून सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्यात. त्यानंतर हळूहळू एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्यात. मात्र, रेल्वे पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Railway Passenger
नांदेड : अतिवृष्टीमुळे वाढला कर्जाचा बोजा

वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांना लाभ

सध्या एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवाशी वाहतुकीवरच अवलंबून राहवे लागत आहे. त्यातही खासगी प्रवाशी वाहतूक ही मोजक्याच मार्गाने असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशीम या तिन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे.

मागणी -

  • अकोला-पूर्णा डेमू अकोटपर्यंत विस्तारित करणे

  • बंद पैसेंजर सुरू करणे

  • भुसावळ-बडनेरा मेमूला डबे वाढवणे

  • अमरावती-पुणे, अजनी-मुंबई पूर्ववत सुरू करणे

  • अकोला - पूर्णा मार्ग - सुरू रेल्वे (एक्स्प्रेस दर्जा)

  • अकोला - पूर्णा डेमू

  • अकोला - परळी

  • अकोला - पूर्णा

जळगाव : महामार्गाबाबत खासदारांकडूनही अखेर बोळवणच!

"एसटी संपामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. ते बघता मध्य रेल्व व दक्षिण-मध्य रेल्वे त्यांच्या नियमित पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात. जेणे करून प्रवाशांना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी करता येऊ शकतो. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे गाड्या तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाकडे आम्‍ही तशी मागणी केली आहे."

- ॲड. अमोल इंगळे, प्रवाशी वाहतूक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com