esakal | सिंदखेडराजा विकास आराखड्याचा कोट्यावधीचा निधी गेला परत

बोलून बातमी शोधा

सिंदखेडराजा विकास आराखड्याचा कोट्यावधीचा निधी गेला परत
सिंदखेडराजा विकास आराखड्याचा कोट्यावधीचा निधी गेला परत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजाच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने ता. ३१ मार्चला ३.३९ कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी बीडीएसवरून प्रशासनाला काढता न आल्याने परत गेला आहे.Billions of funds of Sindkhedraja Development Plan went back मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सिंदखेडराजाचा विकास थांबला. यावर्षीही निधी परत गेल्याने सलग दोन वर्षे कामे थांबणार आहेत.

राज्य सरकारकडून नियोजित कामांसाठी लागणारा निधी वित्त विभागाच्या बीडीएसवरून विविध विभागांना ३१ मार्चला दिला जातो. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २०१०-११ ते २०१९- २० या वित्तीय वर्षांत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या जिल्हास्तरावरील कामांना निधी वितरित करण्यात आला. या अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव सिंदखेडराजा विकास आराखड्यातील २४.९३ कोटीपैकी ३.३९ कोटी रुपयांचादेखील समावेश होता. मात्र ३१ मार्चला बीडीएसवर रात्री साडेअकराच्या सुमारास हा निधी दिला गेला. तांत्रिक अडचणीमुळे अधिकाऱ्यांना हा निधी काढताच न आल्याने परत गेल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर पवळ यांनी केला आहे.

निधीसाठी लढा देणार

सिंदखेडराजा विकास आराखड्यातील परत गेलेला निधी त्वरीत मिळवून द्यावा, या मुद्द्याच्या अनुषंगाने पवळ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करणार आहे. हा निधी मिळेपर्यंत आपण लढा देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

संपादन - विवेक मेतकर