esakal | Video : कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा रास्ता रोको
sakal

बोलून बातमी शोधा

Block the way of Shiv Sainiks in Akola district to protest against the Karnataka government

कर्नाटक सरकारने बेळगाव तालुक्यातील मनुगृत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करुन विटंबना केली. त्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.

Video : कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा रास्ता रोको

sakal_logo
By
प्रा.अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करुन शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.

कर्नाटक सरकारने बेळगाव तालुक्यातील मनुगृत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करुन विटंबना केली. त्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीच्या वेळी वापर करून मते मागितली. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप शासनाने अजिबात शिवाजी महाराजांचा वापर मत मिळवण्यासाठी करू नये, गंभीर अन्यथा परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांनी यावेळी दिला.

 

आंदोलनात गजानन चौधरी, प्रफुल्ल गावंडे, जगादेव छबिले, रूपेश कडू ,शिवा गव्हाणे, मनोज जावरकर, सुनील पाटील, हेमंत कांबे, रवी राठोड, फिरोज चाऊस, संतोष रुद्रकर, अमोल तांबडे, ऋषि देशमुख, नितीन अंबिलकर, पंकज बोर्डे, ऋषभ ठाकरे, अक्षय लकडे, वकास भाई, बाबा चाउस, लकी थाटे, शेखर कावरे, मयूर चव्हाण, तेजस ठाकरे, संदीप घाटे, धीरज उमाळे, मनीष राजूरकर, ऋषी जावरकर, नितीन सुरजूसे, अमोल सफर यांच्यासह असंख्य शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.

 
शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर
 शिवसेना शहर व तालुक्याचे वतीने शिवसेना शहर संर्पक कार्यालयासमोर भगतसिंग चौकात कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुर अप्पा सरकारच्या विरोधात शिवसेना शहर व तालुक्याचे वतीने भगतसिंग चौक येथे जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी कर्नाटक सरकारच्या एकात्मिक पुतळ्यास जोडे, चपला मारून निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विनायक गुल्हाने, तालुका प्रमुख संगीत कांबे, माजी तालुका प्रमुख गजानन चौधरी, मुन्ना नाईकनवरे, बालु टांक, डॉ. महेंद्र नवघरे, अतुल ठोकळ, विलास देशमुख, पांडू कवटकर, किसनराव गावंडे, जगदेव छबीले, शशिकांत खंडारे, गोपाळराव गुल्हाने, विलास गुल्हाने, ओमप्रकाश पाटेकर, नंदकिशोर बबानिया, सचिन गुल्हाने, सविनय गुल्हाने, अभिनव गुल्हाने, संजय गुल्हाने आदींसह बहुसंख्येने शिवसेना शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)