गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा नदीत बुडून मृत्यू

 Both the brothers drowned in the river at Akola Shegaon
Both the brothers drowned in the river at Akola Shegaon
Updated on

शेगाव (जि.बुलडाणा)  : गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या बाळापूर नाका अकोला येथील आमले बंधूंचा नागझरीच्या मन नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवारी दुपारी घडली.


गणरायाचे विसर्जन करण्यासाठी बाळापूर नाका अकोला येथील कल्पेश संजय आमले वय 26 व रूपेश संजय आमले वय 25 हे दोघे घरच्या गणपतीचे विसर्जनासाठी मन नदी वर आले. अचानक दोघेही बुडाल्याने एकच खळबळ उडाली. नदी वर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच धावाधाव झाली.

प्रथम रूपेश ला नदी पात्रातून गणेश भक्तांनी पाण्याबाहेर काढले.श्वासोश्वास चालू व्हावा पंपिंग करून पाहिले.मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर रूपेशची प्राणज्योत मालवली.त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू केली.सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले.

घटनास्थळी उरळ ता.बाळापूर तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी नितिन इंगोले व स्टाफ हजर होते. पंचनामा करून शवविच्छेदन साठी मृतदेह पाठविण्यात आले. सदर नदी घाट हा बाळापूर पो स्टे हद्दीत येत असल्याने पुढील तपास उरळ ता. बाळापूर पोलीस करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola child nutrition food safety incident
Rural Water & Sanitation Workers Await Pay for Months; Government Under Fire
Courage Beyond Life: Akola’s Brave Soldier Pravin Janjal Decorated with Kirti Chakra
Akola
Marathi News Esakal
www.esakal.com