पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याला ब्रेक, मात्र एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

26 अहवालामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, एका 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

अकोला  ः झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या अकोल्यात बुधवारी (ता.10) पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याला ब्रेक बसला आहे. बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या 26 अहवालामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, एका 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोल्यात बुधवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, असे जरी असले तरी बुधवारी उपचार घेताना 62 वर्षीय इसमाचे निधन झाले. हा इसम गाडगे नगर हरिहरपेठ येथील रहिवासी असून तो 6 जून रोजी दाखल झाला होता. पॉझिटिव्ह जरी आढळला नसला तरी मृत्यूच्या वाढत्या दरामुळे आता अकोलेकरांची चिंता वाढली आहे. 

14 जणांना डिस्चार्ज
बुधवारी 14 जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील नऊ जण कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ महिला तर पाच पुरुष आहेत. त्यातील तिघे सिव्हिल लाईन येथील, तिघे हरिहरपेठ येथील, दोघे अकोट फ़ैल येथील तर उर्वरित हिंगणारोड, आंबेडकर नगर, गुरुनानक नगर, गायत्री नगर, सिटी कोतवाली व माळीपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-864
मयत-41(40+1)
डिस्चार्ज-559
दाखल रुग्ण -264 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break to find a positive patient, but death of one

Tags
टॉपिकस
Topic Tags: