‘साडेदहा’च्या आत यार्डात!...शेतकऱ्यांना बाजार समितीची सूचना

अनुप ताले
Friday, 10 July 2020

शेतकऱ्यांच्या व इतरांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना वेळेत शेतमाल आणण्याची सवय लागावी यासाठी आणि वेळेत कामे होण्याच्या दृष्टीने हा निर्णय बाजार समिती तसेच बाजार समिती अंतर्गत इतर सर्व माध्यमाच्या सहमतीने सकाळी 10.30 वाजताच्या आतच आवक स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बाजार समितीचे सचिव सुनिल मालोकार यांनी कळविले आहे.

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक स्वीकारण्याबाबत नवीन सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी 10.30 वाजेपर्यंत आवक स्वीकारली जाणार असून, त्यानंतर येणारी आवक संध्याकाळी 5 वाजतानंतर यार्डात उतरविली जाणार आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 13 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या व इतरांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना वेळेत शेतमाल आणण्याची सवय लागावी यासाठी आणि वेळेत कामे होण्याच्या दृष्टीने हा निर्णय बाजार समिती तसेच बाजार समिती अंतर्गत इतर सर्व माध्यमाच्या सहमतीने घेण्यात आल्याचे बाजार समितीचे सचिव सुनिल मालोकार यांनी कळविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या विषयी नोंद घेऊन वेळेत शेतमाल बाजार समितीमध्ये आणावा, असे आवाहन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठीच निर्णय
सकाळी लवकर शेतमाल बाजार समितीमध्ये आणल्यास त्याचे मोजमाप लवकर होईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अडते, व्यापारी व मजूरांच्या दृष्टीनेही ही बाब फायद्याची ठरेल. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी व वेळेत काम आटोपण्याची सवय लागावी यासाठी तात्पूरत्या स्वरुपात अशी सूचना करण्यात आली आहे.
- सुनिल मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला

 

संपादन - अनुप ताले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bring farm produce by half past ten in the morning