औद्योगिक शहराकडे मजुरांना पाठवण्यासाठी दलाल सक्रिय, अनेकांना जादा पगाराचे अमिश दाखवून पाठविल्या जात आहे शहराकडे

महादेव घुगे
Thursday, 30 July 2020

मागील चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने औद्योगिक शहरामध्ये थैमान घातला आहे. औद्योगिक शहरामध्ये खाजगी कंपन्यातील मजूर वर्ग स्वगृही परतल्याने अनेक कंपन्या, उद्योग मजुराअभावी बंद पडल्या आहेत. आता अनेक कंपन्यानी मजूर मिळविण्यासाठी मुकादम (दलाल) शोधले असून, ते जादा पगाराचे अमिश दाखवून मजुरांना रातोरात औद्योगिक शहरातील कंपन्यांकडे पाठवित आहेत.

रिसोड ः मागील चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने औद्योगिक शहरामध्ये थैमान घातला आहे. औद्योगिक शहरामध्ये खाजगी कंपन्यातील मजूर वर्ग स्वगृही परतल्याने अनेक कंपन्या, उद्योग मजुराअभावी बंद पडल्या आहेत. आता अनेक कंपन्यानी मजूर मिळविण्यासाठी मुकादम (दलाल) शोधले असून, ते जादा पगाराचे अमिश दाखवून मजुरांना रातोरात औद्योगिक शहरातील कंपन्यांकडे पाठवित आहेत.

मागील काही दशकांपासून रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी औद्योगिक शहराकडे वाटचाल केली. यामध्ये काहींना आपल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार खाजगी कंपन्यामध्ये नोकरी-रोजगार मिळाले तर, काहींनी भाजीपाला विक्रीसारखे व्यवसाय सुरू केले. यामुळे अनेक कुटुंब हे कायमस्वरूपी शहरात स्थायिक झाले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परंतु अचानक आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने प्रथम शहरामध्ये थैमाण घातल्याने अनेकांचे जीवन अस्ताव्यस्थ झाले. यावर उपाय म्हणून प्रशासनाने वेगवेगळ्या टप्प्यातील लाॅकडाउन घोषित केले. या दरम्यान वाहतूक व्यवस्थाची चाके जागेवरच रूतल्याने अनेक कुटुंबांना मिळेल त्या साधनाने तर, काही कुटुंबांतील सदस्यांना पायंदळी घराचा रस्ता धरावा लागला. शहरातील मिळणाऱ्या एका भाकरी ऐवजी आपल्या गावखेड्यातील आर्धी भाकरीच बरी हा अजेंडा अवलंबवित गावामध्येच रोजमजुरी करत आहेत.

परंतु हल्ली औद्योगिक शहरातील अनेक कंपन्या-उद्योग मजुरांअभावी मोडकळीस पडले आहेत. परंतु त्यामध्ये निर्माण केल्या जात असलेल्या कच्च्या मालाकरीता नितांत मजुरांची गरज आहे. यासाठी अनेक व्हाॅट्सॲप गृपद्वारे मजूर पाहिजे. अशा प्रकारचे मेसेज व्हायलर होत आहेत. परंतु कोरोना विषाणूचा कहर वेगाने वाढत असून, गाव खेड्यापर्यंत रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरी भागातील परतलेला मजूर वर्ग शहराकडे रोजगारासाठी जाण्यास धजावत नाही.

त्यामुळे अनेक कंपन्यांनी तांडा-वस्तीवरील अनेक अल्पवयीन मुले खाजगी कंपन्यांनी ठरवून दिलेल्या मुकादम (दलालांचे) सावज ठरत आहेत. अनेक अल्पवयीन मुलांना जादा पगाराचे अमिष दाखवित जेवण-राहण्याची मोफत व्यवस्था करून जादा पगार मिळण्याच्या भुलथापा देत अनेक मुकादम स्वताःचे उखळ पांढरे करताना दिसत आहेत. रातो-रात खाजगीतील वाहणाद्वारे मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद सारख्या औद्योगिक शहरामध्ये या युवकांना हलविण्यात येते.

परंतु कोरोना विषाणूने अनेकांच्या मनामध्ये धडकी भरल्याने बहुतांश शहरातील उद्योग, व्यवसाय बंद पडले असताना दलाल-मुकादम मात्र मजुरावरील वर कमाईने त्यांचे उखळ पांढरे करण्याच्या बेतात अनेक युवकांना जादा पगाराच्या अमिषात अडकवित सावज ठरवित आहेत.

ज्या परीसरामध्ये हे युवक रोजगारासाठी गेले तेथील कोरोणाची भयाण परीस्थिती पाहाता अनेक युवक अवघ्या आठवडा भरातच माघारी परत येत आसल्याने येतांना कोरोना सारख्या आजारांना एक प्रकारे आमंत्रणच मिळत आसल्याचे चित्र हल्ली ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brokers active in sending laborers to Akola industrial city, Many are being sent to the city for extra pay