Social Example : विधवा वहिनीचे दिराने केले कन्यादान; निकम परिवाराने उभा केला सामाजिक आदर्श
Marriage : भावाच्या निधनानंतर विधवा झालेल्या वहिनीला दिराने पित्याची भूमिका स्वीकारून विवाह केला. निकम परिवाराने एक सामाजिक आदर्श तयार करून तिचा विवाह थाटामाटात पार पडला.
बुलडाणा : भावाच्या निधनानंतर तरुण वयात विधवा झालेल्या वहिनीसाठी दिराने पित्याची भूमिका घेतली. मानस फाऊडेशनच्या मध्यमातुन विधवा वहिनीचे लग्न जुळून आणण्यासाठी परिवाराची मानसिकताही तयार केली.