
अकोला : खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जात व धर्म विचारून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होणे आवश्यक असून, आतापर्यंतच्या सर्व गृहमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार आणि कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.