esakal | कोरोनाकाळातही १० टक्के पगारवाढ अन् रोजगारही
sakal

बोलून बातमी शोधा

money

कोरोनाकाळातही १० टक्के पगारवाढ अन् रोजगारही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा: कोरोना महामारीमुळे एकीकडे जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात असताना व बेरोजगारी वाढत असताना बुलडाणा अर्बन पतसंस्थेने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच १० टक्के पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही देशातील सर्वांत मोठी पतसंस्था आहे. १६ हजार ५०० कोटी रुपयांचा संस्थेचा व्यवसाय आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, सीमांध व तेलंगणामध्ये ४६५ शाखा कार्यरत असून सुमारे चार हजार कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांनी लाॅकडाउनच्या काळातही सभासदांना अखंड सेवा दिली. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ देऊन मोठा दिलासा दिला आहे. याशिवाय, २०० नवीन युवकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना बचत गटामार्फत हिंदुस्तान मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कोरोनाकाळात ३५ हजार सभासदांना ८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. याशिवाय, संस्थेने गेल्या वर्षीच्या संस्थेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश वाटप केला आहे.

कर्मचारी संस्थेचा कणा

कोणतीही संस्था कर्मचाऱ्यांच्या बळावर मोठी होत असते, मात्र अडचणीच्या काळात आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी संस्थेची असते. कोरोना महामारीच्या काळात संस्थेतील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दीडशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना या भयंकर आजारातून यावे लागले. त्यामुळे त्यांच्या प्रति सहानुभूतीची भावना ठेवून संस्थेने पगारवाढीचा निर्णय घेतला असल्याचे राधेश्याम चांडक यांनी सांगितले.

loading image