Makarand Patil : जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल; पालकमंत्री मकरंद पाटील : शासकीय ध्वजारोहण उत्साहात
Buldhana Development : बुलडाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुरू झाला असून, कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण व इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या विकासाची ग्वाही दिली असून, जिल्ह्याचा विकास कायम चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातुन जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.