बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण; दोघे गेले वाहून

गेल्या १२ तासांपेक्षाही अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे
बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण; दोघे गेले वाहून
बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण; दोघे गेले वाहूनsakal

बुलडाणा : गेल्या १२ तासांपेक्षाही अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. आधीच ओव्हरफ्लो असलेल्या प्रकल्पामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असल्यामुळे अनेक मार्गावरील पूल पाण्याखाली आहे. यात प्रामुख्याने खामगाव ते चिखली, चिखली ते बुलडाणा, मोताळा ते नांदुरा मार्गाचा समावेश आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपर्यंत सदर परिस्थिती कायम राहणार असल्याचे इशारा प्रशासनाने दिला असून, अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.

बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे ओव्हरफ्लो झाला असून, स्वयंचलित गेट उघडले आहे. पैनगंगा नदी काठच्या साखळी, किन्होळा, सवणा, दिवठाणा, उत्रादा, पेठ, चांढई या गावाला पुराचा मोठा फटका बसला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यातील अंचरवाडी भाग एक व भाग दाने हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे.

असे आहे मार्ग बंद

पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चिखली ते बुलडाणा मार्ग साखळीनजीक पुलावरून पाणी गेल्यामुळे 27 सप्टेंबर रात्री 11 वाजेपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांसह मालवाहतूक ठप्प झाली आहे. अंचरवाडी प्रकल्पातून ओव्हरफ्लो झाल्यामुळे अंचरवाडी ते शेलगाव आटोळ वाहतूक रात्रीपासून बंद आहे. चिखली ते खामगाव मार्गावरील उत्रादा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रात्रीपासून वाहतूक बंद आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण; दोघे गेले वाहून
"तर श्रेयस अय्यरला मिळणार T20 World Cupचं तिकीट"

तरुणासह वृद्ध गेले पुरात वाहून

बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील तरुणासह वृद्ध शेतानजीक असलेल्या नाल्यात वाहून गेल्याची घटना 27 सप्टेंबरला रात्री घडली. राहुल दशरथ चौधरी (वय 27) याने पुरात वाहून जात असताना काही अंतरावर बाभळीच्या झाडाला पकल्यामुळे वाचला. रात्रभर तेथेच राहून आज (ता.28) सकाळी ग्रामस्थांसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक शोधार्थ गेले असता त्यांना तो दिसून आला. त्याला तत्काळ शेकोटी करत बचाविण्यात यश आले. सुनील रामकृष्ण काळवाघे यांच्या शेतानजीक नाल्याच्या पाण्यातून दुचाकी काढण्याच्या नादात तो वाहून गेला होता. शेडपासून काही अंतरावर त्यांची दुचाकी नाल्याच्या काठावर आढळून आली. तर, वृद्ध भगवान लक्ष्मण गोरे (वय 55) हे वाहून गेले असून, पथकासह ग्रामस्थांना सकाळी 11 वाजेपर्यंतचही त्यांचा काहीच सुगावा लागला नाही.

प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व 19 दरवाजे 50 सेंमीपर्यंत उघडण्यात आले असून त्यातून 37 हजार 940 क्यूसेस, पेनटाकळी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात येऊन त्यातून 44.65 क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तुडुंब

नळगंगा 75.50 टक्के, खडकपूर्णा 90.36 टक्के, पेनटाकळी 75.85 टक्के, ज्ञानगंगा 100 टक्के, मस 67.74 टक्के, कोराडी 100 टक्के, पलढग 100 टक्के, मन 98.77 टक्के, तोरणा 97.12 टक्के, उतावळी 100 टक्के.

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण; दोघे गेले वाहून
ब्लॅक लिस्टेड कंपनी आरोग्य विभागाचा विषय नाही - राजेश टोपे

राजूर, बोथा घाटात दरड कोसळली

बुलडाणा ते मलकापूर व बुलडाणा ते खामगाव मार्गावर असलेल्या राजूर व बोथा घाटात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन दगड- माती आली आहे. दोन ठिकाणी दरडही कोसळली आहे. परंतु, वाहतूक सुरळीत परंतु, काळजीपूर्वक आणि धीम्यागतीने सध्या सुरू आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांचे एक पथक या परिस्थितीवर नजर ठेवत पोलिसांच्या मदतीने सदर मार्गावरील वाहतूक करण्यात येत आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असे कळविण्यात आले आहे.

येणारे दोन ते तीन दिवस धोक्याचे

जिल्ह्यात येणार्‍या काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीत वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे. पाऊस सुरू असताना शेतकर्‍यांनी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये, सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली/ पाण्याच्या स्त्रोताजवळ/ विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वत्र प्रकल्पातून विसर्गाचा इशारा

जिल्ह्यातील नळगंगा, पैनगंगा, पेनटाकळी, पलढग, उतावळी, खडकपूर्णासह स्वयंचलित दरवाजे असलेल्या प्रकल्पातून पाण्याची येणारी आवक पाहता प्राण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संबंधित नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे असा इशारा पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

शेतीला सर्वाधिक फटक

जिल्ह्यातील काढणीला आलेले मूग, उडीद तसेच सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला असून, हजारो हेक्टर शेतात संततधार पावसामुळे पाणी साचून आहे. सोयाबीनच्या सूड्या आणि कापणी करून शेतातच असल्यामुळे त्याला आता कोंब फुटत असून, शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास आता हिरावला जात आहे. याबाबत शेतकर्‍यांनी तत्काळ मदत मिळाण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com