Akola News: गोदामाला लागलेल्या आगीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Lack of Fire Safety and Water Supply :बाळापूर रिधोरा येथील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लाखो रुपयांचा नाफेड हरभरा सुरक्षित ठेवताना अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची सोय नव्हती.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये ‘नाफेड’चा लाखो रुपयांचा हरभरा साठवून ठेवलेला असतानाही, आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा ‘फायर इस्टिग्युशर’ नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलिस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com