esakal | रुग्ण वाढत असलेल्या शहरातील पाच कंटेन्मेंट झोन रद्द, वाचा कुठे केली कोरोनावर नागरिकांनी मात
sakal

बोलून बातमी शोधा

amc

महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या 600 च्या घरात पोहोचली आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी असून, हे रुग्ण दररोज शहरातील नवीन परिसरातील असल्याने आतापर्यंत 113 परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहे.

रुग्ण वाढत असलेल्या शहरातील पाच कंटेन्मेंट झोन रद्द, वाचा कुठे केली कोरोनावर नागरिकांनी मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या 600 च्या घरात पोहोचली आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी असून, हे रुग्ण दररोज शहरातील नवीन परिसरातील असल्याने आतापर्यंत 113 परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहे. पाच परिसरांमध्ये 28 दिवसांत एकही रुग्ण आढळला नसल्याने कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले.


अकोला महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 600 च्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. त्यापेक्षाही अधिक चिंता वाढविणारी बाब म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रात होत असलेली वाढ आहे. आतापर्यंत काही मर्यादित क्षेत्रापुरता मर्यादित असलेला संसर्ग आता शहराच्या मध्यवर्ती भागासह सीमावर्ती भागातील वस्तांमध्येही पोहोचला आहे. त्यासोबतच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे दररोज नवीन प्रतिबंधित क्षेत्राची भर पडत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 113 झाली होती.


पाच झोन वगळले
कंटेन्मेट झोनमध्ये मागील 28 दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण न आढळल्याने सिंधी कॅम्प, शिवर, जयहिंद चौक, शंकर नगर, आकोट फैल, शिवनी या परिसरांना कंटेन्मेंट झोनमधून वगळ्यात आले आहे.


हे परिसर आहेत सिल
बैदपुरा, अकोट फैल, कृषिनगर, खैर मोहम्मद प्लॉट, मेहरेनगर डाबकी रोड, कमलानगर वाशीम बायपास, रवीनगर सुधीर कॉलनी, गुलजारपुरा आरपीटीएस रोड, न्यू राधाकिसना प्लॉट, माळीपुरा, अगरवेस राजपुरा, आळशी प्लॉट, तारफैल, अक्कलकोट हरिहरपेठ, बापूनगर, रामनगर म्हाडा कॉलनी, गडंकी आरपीटीएस रोड, भवानीपेठ तारफैल, आझाद कॉलनी, आंबेडकरनगर सिव्हिल लाईन्स, मोठी उमरी, तकीया अगरबेस, खिडकीपुरा जुने शहर, खडकी, जीएमसी क्वॉटर गौरक्षण रोड, शास्त्रीनगर, पोलिस क्वॉटर रामदासपेठ, अंसार कॉलनी, राजपुतपुरा, नायगाव, लक्कडगंज रोड, आनंदनगर दमानी हॉस्पिटल, सावंतवाडी रणपिसेनगर, डाबकी व्हिलेज डाबकी रोड, गीतानगर जुनेशहर, रेल्वे क्वॉटर जठारपेठ, संतोषी माता चौक मालधक्का रोड, आदर्श कॉलनी, कच्ची खोली सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट जुने शहर, अकोली गाव गीतानगर जुने शहर, सावतराम मिल दगडी पूल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट, लोरिया कम्पाऊंड खोलेश्वर, नानकनगर निमवाडी, खेताननगर कौलखेड, गुलजारपुरा रिव्हर साईड, जागृती विद्यालय रणपिसेनगर, देशमुख फैल, न्यू तारफैल, चरिणीया कम्पाऊंड लक्कडगंज रोड, मोहता मील रोड, व्हीएचबी कॉलनी गोरक्षण रोड, ज्योतीनगर जठारपेठ, सोनटक्के प्लॉट-२ जुने शहर, जोघळेकर प्लॉट, महोदव मंदीर गोकूळ कॉलनी, गायत्रीनगर, लक्ष्मीनगर, पार्वतीनगर, दसेरानगर हरिहरपेठ, हमजा प्लॉट, मलकापूर चौक मेन रोड, आरोग्यधाम कॉलनी मलकापूर, राऊतवाडी, नाईस बेकरी, प्रमोद सॉ मील लक्कडगंज, श्रावगी प्लॉट, इकबाल कॉलनी मोहता मील रोड, चांदखा प्लॉट हरिहर पेठ, खदान मंगरुळपीर रोड, न्यू बैदपुरा, रणपिसेनगर-2, गाडगेबाब चाळ शिवाजी पार्क, माधननगर गौरक्षणरोड, पावसाळे लेआऊट कौलखेड, पेन्शनपुरा सिंधी कॅम्प, नवाबपुरा, नाजूकनगर, कागजीपुरा तेलीपुरा, ताथोडनगर मोठी उमरी, शंकरनगर गौरक्षणरोड, वृंदावननगर हुनमान नगर, राहुलनगर शिवनी, मनोरथ कॉलनी, आईस फॅक्ट्री जठारपेठ, शिवसेना वसाहत जुने शहर, संताजीनगर, फिरदौस कॉलनी-२, गुलशन कॉलनी रामदासपेठ, तापडियानगर बिर्लागेट, गायत्रीनगर हिंगणाफाटा, कच्ची खोली-२ हिंगणा फाटा, गर्ल्स होस्टल आरटीएएम जठारपेठ, देशमुख पेठ देशमुख फैल, कमला नेहरूनगर, स्वामी समर्थ मंदीर जठारपेठ, न्यू खेताननगर-2 कौलखेड, गौशननगर मोहता मील रोड, बलोदे लेआऊट, कैलास टेकडी सिंधी कॅम्प, हरिहर मंदीर हरिहरपेठ, खदान सिंधी कॅम्प, गड्डम प्लॉट दत्त मंदीर रामदासपेठ, महाकाली अपार्टमेंट खोलेश्‍वर, भगतसिंग पुतळा लहान उमरी, किशन कन्हैया अपर्टमेंट जठारपेठ, सिटी कोतवाली चौक.