akola crime
sakal
अकोला - अकोला स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून, मारहाण व चाकूने वार करून कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील नाशिक, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांतील तीन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीची कार, सात मोबाईल फोन, एअरगन, छरे, बारुदाचे साहित्य आणि मोटारसायकल असा एकूण १८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.