राम मंदिरासाठी अकोल्यातील कारसेवक 11 दिवस होते स्थानबद्ध

मनोज भिवगडे
Wednesday, 5 August 2020

राम जन्मभूमी अयोद्ध्या येथे बुधवारी राम मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात होत आहे. आजचा हा दिवस अनेक कार सेवकांच्या त्यागाने बघावयास मिळाला. त्यात अकोल्यातील कारसेवकही आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी कार सेवा करताना ११ दिवस अटकेत राहूनही अयोध्येला जाऊन सेवा दिला होती.

अकोला ः राम जन्मभूमी अयोद्ध्या येथे बुधवारी राम मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात होत आहे. आजचा हा दिवस अनेक कार सेवकांच्या त्यागाने बघावयास मिळाला. त्यात अकोल्यातील कारसेवकही आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी कार सेवा करताना ११ दिवस अटकेत राहूनही अयोध्येला जाऊन सेवा दिला होती.

अकोला पश्चिमचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, ज्येष्ठ पदाधिकारी सिद्धार्थ शर्मा, गिरीष जोशी, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, राजू अग्रवाल, गणेश पोटे, नंदू ढोरे, लक्ष्मणदास आलिमचंदाणी आदींसह शेकडो कार्यकर्ते पश्चिम विदर्भातून कारसेवक म्हणून गेले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अयोद्धेला ६ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला पोहोचता यावे म्हणून २५ नोव्हेंबरलाच अकोल्यातील कारसेवक अयोद्ध्येत दाखल झाले होते. तेथे पोहोचण्यापूर्वी इटारसीमध्ये त्यांना दोन दिवस अटक करून ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी अयोद्धेला निघालेल्या अकोल्यातील कारसेवकांना झाशी येथे ११ दिवस एका शाळेत स्थानबद्ध करण्यात आले होते.

तीन वेळा कारसेवक म्हणून गेलेल्या अकोल्यातील पदाधिकाऱ्यांचा आजही राम मंदिर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तेव्हाच्या आठवडी काढताना राम मंदिर उभे राहवे याबाबतची तळमळ त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. ज्या राम मंदिरासाठी रक्क सांडले त्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्याची खंत असली तरी आपल्या हयातीतच मंदिराची पायाभरणी सुरू होत आहे, याचे समाधान या कारसेवकांनी बोलून दाखवले.

अकोल्यातच राहूनच होणार सोहळ्याचे साक्षिदार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अयोद्ध्या येथे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची इच्छा प्रत्येक कारसेवकांची होती. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असल्याने अकोल्यात राहूनच राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याचे साक्षदार होऊ, असे कारसेवक म्हणाले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The carsevak in Akola was stationed for 11 days for the Ram temple