
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे याच्याविरुद्ध पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आरपीआय महानगराध्यक्ष गजानन कांबळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
अकोला - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून ता. २ ऑगस्ट रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कांबळे सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. २ ऑगस्ट रोजी एका पीडित महिलेने गजाजन कांबळे याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार गेले चार ते पाच वर्षांपासून कांबळे हा पीडित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवून होता. त्यातून त्याने अनेक पर्यटन स्थळावर नेवून पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाबाबत विचारणा केली असता लवकरच करू, असे आश्वासन देत होता. गत महिन्यात अकोल्यातील हॉटेल आरएस येथे एक खोली घेवून तीन-चार दिवस पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याचेही तक्रारीत नमुद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३७६ (दोन) (एन) व ३७६, ५०४, ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Case Of Rape Registered Against Rpi Municipal President Gajanan Kamble Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..