अकोला : उन्हाळ्यात विविध ठिकाणी समाज जीवन सुसंस्कारित होण्यासाठी कथा, पुराणे, भजन, कीर्तन प्रवचनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. अध्यात्माला जर विज्ञानाची जोड दिली तर भविष्यात अधिक गोड दिवस येतील..असाच एक ज्ञानयज्ञ ९ ते १५ या कालावधीत आकाशात संपन्न होत आहे. त्यात आकाश प्रेमींनी सामील होण्याचे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे. आकाशात नेहमीच विविध प्रकारच्या खगोलीय घटना घडत असतात. मार्च महिन्यातच्या मध्यातही अशाच घटना घडणार आहेत..आकाशात घडणाऱ्या घटनांमध्ये जगभरात बहुचर्चित सुनिता विल्यम्स गेल्या नऊ महिन्यांपासून ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर आहेत ते अंतराळ संशोधन केंद्र संध्याकाळी ७.१२ ते ७.१७ या वेळेत दक्षिणेकडून पूर्वेस फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे ५.०६ ते ५.०९ या वेळी स्पेस स्टेशन उत्तर ते दक्षिण आकाशात जरा वरच्या भागात आणि पुन्हा रात्री ८.०१ ते ८.०५ या वेळी पश्चिम ते उत्तर ध्रुवाकडे जाताना पाहता येईल..त्यानंतर उत्तर ध्रुव तारा व दक्षिण आकाशात रंगीन अगस्त्य तारका सहज बघता येतील. पश्चिम आकाशात ११ मार्च रोजी मंगळवारी तेजस्वी शुक्र आणि बुध ग्रहाची युती बघण्याची अनुभूती एक अनोखी पर्वणी ठरेल. एरवी लवकर न दिसणारा बुध ग्रह शुक्राचे डाव्या बाजुस अगदी जवळ असेल. याच दिवशी रात्री ७.१२ ते ७.१९ या वेळी स्पेस स्टेशनला पश्चिम ते उत्तर बाजूला बघता येईल. चौथ्या दिवशी १२ मार्च रोजी चंद्र हा सिंह राशीत मघा नक्षत्रात तर जरा खाली दोन तारकांचे पूर्वा फाल्गुनी व उत्तरा फाल्गुनी नक्षत्र छान पैकी बघता येईल..होळी पौर्णिमेला खंडग्रास चंद्र ग्रहणहोळी पौर्णिमेला १३ मार्च रोजी चंद्र फाल्गुनी नक्षत्रात असून यावेळी पर्यावरण रक्षणार्थ वाईट विचार व नकोशा प्रथा परंपरांचे दहन करून १४ मार्चचे खंडग्रास चंद्र ग्रहण भारतीयांना प्रत्यक्ष नभांगणात न दिसता टी.व्ही. वर बघावे लागेल, कारण हे चंद्रग्रहण आपल्या देशात दिसणार नाही. याच दिवशी सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल..Agriculture Crisis : कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष; ‘गट-क’ कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त, शेतकऱ्यांची गैरसोय.यज्ञ सप्ताहाची सांगता शनिवारीया आकाश यज्ञ सप्ताहाची सांगता १५ मार्च रोजी बुध ग्रह वक्री व शुक्र सूर्य भेटायला आतुर असेल आणि रात्रीच्या प्रारंभी पूर्व क्षितिजावर नव्या रुपात नटलेल्या कन्या राशीतील चित्रा तारका पुन्हा एकदा आकाशातील नवे चित्रांगण दर्शनार्थ सज्ज असेल. आपणही उन्हाळ्याच्या उष्ण झळांच्या कळा कमी करण्यासाठी आकाशाकडे बघायला तयार होऊ या, असे आवाहन दोड यांनी केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.