Akola; जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता

अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यताfILE PHOTO

अकोला ः जिल्ह्यात ७ ते ११ जूनपर्यंतच्या कालावधीत विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या नागपूर (Nagpur of Meteorological Department) येथील वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासह (Rain in Akola) तुफान वादळी वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. त्यासोबतच घरांची सुद्धा पडझड झाली होती. दरम्यान आता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७ ते ११ जून पर्यंतच्या कालावधीदरम्यान विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान वेधशाळेच्या नागपूर येथील कार्यालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी व विज, पाऊस यापासून स्वतःचे व आपल्या पशुधनाचे संरक्षण होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Chance of heavy rains in Akola district till Friday)

अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
बुलढाण्यात झुंबड; चिखली येथे मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी


अशी घ्यावी काळजी
- विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- वीज व वादळापूर्वी संगणक, टेलिव्हीजन इत्यादी विद्युत उपकरणे बंद करून स्त्रोतापासून अलग करून ठेवावित.
- वीज चमकत असताना मोकळे मैदान, झाडाखाली, विजहानी अथवा ट्रान्सफार्मरजवळ थांबू नये. अशावेळी मोबाईलचा उपयोग करू नये.
- पूरस्थितीमध्ये नदीचा पूर पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये.
- पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये.
- पूरस्थितीमध्ये जाण्याचा/पोहण्याचा प्रयत्न करू नये.
- पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे.

संपादन - विवेक मेतकर

Chance of heavy rains in Akola district till Friday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com