
चिखली : स्थानिक नगरपालिकेच्या १३२ कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच पेनटाकळी येथे नवीन जॅकवेलसाठी जागा निश्चिती होणार आहे. यामुळे शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही नवीन पाणीपुरवठा योजना शहरासाठी जलक्रांती करणारी ठरणार आहे.