esakal | वीज, अतिवृष्टी, पूरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी!
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गीक वीज

वीज, अतिवृष्टी, पूरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार आगामी काही दिवसांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टी, वीज कोसळणे, पूरस्थिती बाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. (Citizens should be vigilant in case of power outages, floods!)

यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या सुरक्षा सुचनेप्रमाणे वीज कोसळण्याचे वातावरण तयार झाल्यास घरातील टिव्ही, संगणक, फ्रिज इत्यादी विद्युत उपकरणे बंद करुन विद्युत प्रवाह जोडणीपासून दूर करावे, मोबाईल, दूरध्वनीचा वापर टाळावा, दारे खिडक्या बंद करुन घरात सुरक्षित आश्रय घ्यावा, आकाशात वीज चमकल्यानंतर १० सेकंदांनी मेघ गर्जनेचा आवाज आल्यास त्या भागात तीन किमी परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असते, असे समजावे, शेतात काम करताना जेथे असाल तेथेच थांबावे, पायाखाली लाकूड, कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवून थांबावे. डोके जमिनीला टेकवू नये, आपले वाहन विजेचे खांब, झाडे यापासून दूर ठेवून सावकाश चालावे, पूरस्थिती निर्माण झाल्यास नदी, नाला काठावर पूर पाहण्यास गर्दी करु नये, नदीनाल्याच्या पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु नये, सद्यस्थितीत पाऊस सुरु असून केव्हाही नदीची पाण्याची पातळी वाढू शकते, पुलावरुन पूराचे पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, आपात्कालीन स्थितीत जवळचे पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय, अग्निशमन विभाग, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.


Citizens should be vigilant in case of power outages, floods!

loading image