
परभणी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या तोडफोडीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता.११) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. आज सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील सर्व व्यापारी आस्थापने बंद होती.