
अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात दि.११ जून रोजी विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ, मूर्तीजापूर तसेच अकोट विधानसभा मतदारसंघातील विविध कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्ता संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (ता.११) क्रिकेट क्लब येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.